| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील विद्या विकास मंदिर शाळेमध्ये वंदे मातरम् या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. देशातील विविध राज्यात वंदे मातरम् गीताचे ज्याप्रमाणे सादरीकरण होते, त्याप्रमाणे शाळेच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उत्तम संगम झालेला दिसून आला.
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून अखंड भारत दर्शन घडवणार असल्याचे स्पष्ट केले. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे उपाध्यक्ष बल्लाळ जोशी, कार्याध्यक्ष प्रसन्न खेडकर, कार्यवाहक अमित जोगळेकर यांच्यासह इंग्रजी माध्यम शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष तसेच मंडळाचे सदस्य सुर्वे, पिंपुटकर व मंडळाचे सल्लागार अरुण धारप यांच्यासह मुख्याध्यापिका शैलजा निकम, विनया काकडे, स्वाती दिघे व स्नेहा म्हसे आदी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी एका स्वतंत्र राज्यातील भाषा आणि पोशाख यांची माहिती सादर करणाऱ्या गीतावर नृत्य सादर केले. त्यात वेगवेगळी राज्ये जरी असली तरी आपण एकाच अखंड भारताचे नागरिक आहोत, ही भावना मुलांना अनुभवण्यास मिळाली. स्नेह संमेलनाचे सूत्रसंचालन वर्षा गायकवाड यांनी केले.







