| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेच्या 20 प्रभागांमध्ये एकूण 255 उमेदवार आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. निवडणूक सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उमेदवारांची प्रचंड संपत्ती हा आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील भाजप उमेदवार इकबाल हुसैन काझी यांची कौटुंबिक संपत्ती तब्बल 171 कोटी रु. आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील मधू पाटील यांच्या कुटुंबाची संपत्ती 140 कोटींवर असून, प्रभाग क्रमांक 7 मधील राजेंद्र शर्मा यांची संपत्ती 30 कोटी आहे. भाजपचे चंद्रकांत सोनी, संतोष शेट्टी आणि दशरथ म्हात्रे यांनी ही 18 ते 19 कोटींच्या घरात संपत्ती दाखविली आहे. शेकापचे अरविंद म्हात्रे यांनी 37.88 कोटींची, दिलीप कदम यांनी 10.45 कोटींची नोंद केली. प्रभाग क्रमांक 18 मधीला ममता प्रीतम म्हात्रे यांची संपत्ती जवळपास 44 कोटी पेक्षा अधिक संपत्ती जाहीर केली आहे.






