| खरोशी | प्रतिनिधी |
पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल सहायक पोलीस अधिकारी राजपूत, ठाणे अंमलदार आणि पोलीस कर्मचारी यांच्यासमवेत रेझिंग डे पोलीस वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना पोलीस अधिकारी भारावून गेले. पेण येथील सुमतीबाई वि. देव सुबोध विद्यालय पेण येथील प्रशालेतील तिसरी इयत्तेतील 130 विद्यार्थ्यांना पोलीस अधिकारी राजपूत यांनी शस्त्र बंदूक कशी हाताळायची, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. याशिवाय पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्याशी विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने संवाद हितगुज साधले. अनेक बाबींचे मजेशीर कुतूहल आणि बिनधास्तपणा पाहून पोलिसही भारावले. नव्या भारताची ही नवी पिढी निर्भीड बोल बरंच काही सांगून जाते. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता घोडके, सहशिक्षिका प्रज्ञा कावतकर, अदिती कुत्रे, शिक्षक दुर्गेश वारगुडे, देवेंद्र नाईक यांनी हा शैक्षणिक उपक्रम मुलांसाठी पेण पोलिस ठाण्यात भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रफुल्लीत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच पोलिसांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकांमुळे मुलांच्या मनातील पोलिसांविषयी असलेली भीती नाहीशी झाली. शालेय विद्यार्थ्यांनी या परिसर भेटीने आनंद व्यक्त करत शिक्षक वर्गाने ही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.







