। पनवेल । प्रतिनिधी ।
अज्ञात वाहकाने दिलेल्या धडकेत एक 54 वर्षीय व्यक्ती जखमी झाल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे. तक्रारदार, विष्णु जिबल रा. पनवेल हे पळस्पे परिसरात असताना वाहन क्रमांक एमएच 43 सी ई 6831वरील चालकाने त्याच्या वाहनाने विष्णु जिबल यांना जोरदार धडक दिली. या धडकेत विष्णु जिबल गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.






