। पनवेल । वार्ताहर ।
वडघर खाडी पुलाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष, रंग गोरा, बांधा मजबुत, अंगात नेसून हीरवट रंगाचा हाफ बाह्यांचा गोळ गळ्याचा टी शर्ट, राखाडी रंगाची फुल नाइट पॅन्ट आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा सपोनि प्रवीण फडतरे यांच्याशी संपर्क साधावा.







