| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुडच्या कायस्थ प्रभू समाज व देवस्थान ट्रस्ट अंतर्गत स्नेहप्रभा महिला मंडळातर्फे श्रीलक्ष्मी नारायण मंदिरात मकर संक्रांतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी श्रीलक्ष्मी नारायण देवताची मनोभावे पूजा करून दीपा सबनीस यांनी लक्ष्मीची ओटी भरली, तर स्नेहप्रभा महिला मंडळांच्या अध्यक्षा जयश्री प्रधान यांनी प्रास्ताविकात आपले विचार मांडले.
चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज अध्यक्षा नैनिता कर्णिक यांनी समाज करत असलेल्या यशस्वी वाटचालीबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांचा माजी समाज अध्यक्ष सुनील कुळकर्णी, चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज अध्यक्षा नैनिता कर्णिक, सचिव संदेश मथुरे, उपाध्यक्ष अशोक सबनीस, स्नेहप्रभा महिला मंडळ अध्यक्षा जयश्री प्रधान, उपाध्यक्षा सुचिता पोतनीस, सचिव साक्षी नागले, खजिनदार सुषमा पोतनीस, सुप्रीया मथुरे यांच्या हस्ते श्रीफळ, भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज व देवस्थान देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनय रा.मथुरे, विनय सो. मथुरे, राजेंद्र पोतनीस, सुप्रिया मथुरे, नयन कर्णिक, अरुणा चित्रे, प्रतिभा मोहिले, कल्पना मथुरे, मुग्धा दांडेकर, कविता वाणी उपस्थित होत्या.






