| गडब | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे वडखळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संजय जांभळे यांच्या प्रचाराची सुरूवात वाशी येथील माता जंगदबेच्या मंदिरात करण्यात आली. त्यांनतर वाशी विभागात प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्तानी संजय जांभळे यांना विजयी करण्याचा निर्धार केला.
याप्रसंगी बोलताना संजय जांभळे म्हणाले की, आजची हि गर्दी शेकापच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्यासाठी जमली आहे. जनता जागृक झाली आहे. मागील 5 वर्षांत जनतेच्या समस्या न सोडवणाऱ्यांना या निवडणुकीत मतदार घरी बसवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, वाशी खारेपाटातील जनसामान्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप हे सत्ताधाऱ्यांचे आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी वाशी पाणी प्रश्नी जनतेची दिशाभूल करीत आहेत. आदानी-अंबानी सारख्या उद्योगपतींच्या घशात येथील सुपीक जमिनी घालण्याकरिता पाणी न देण्याचे षडयंत्र सत्ताधारी करीत असल्याचा आरोप देखील संजय जांभळे यांनी केला. यावेळी पेण तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष अशोक मोकल, निलेश म्हात्रे, रोशन पाटील, वैभव म्हात्रे, राजन झेमसे आदींसह महीला व नागरीक शेकोडोच्या संख्येने उपस्थित होते.






