। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील पळस्पे गाव येथे पनवेल शहर पोलीस ठाणे व सहाय्यक पोलीस आयुक्त युनिट 3 च्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारुचा साठा हस्तगत केला असून, याप्रकरणी एका महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पळस्पे गाव परिसरात एक महिला बेकायदेशीररित्या देशी दारुचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस व सहाय्यक पोलीस आयुक्त युनिट 3 ला मिळताच त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून जवळपास 4 हजार 800 रुपयाचा देशी दारुचा साठा हस्तगत केला आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त ढोले, वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस हवा.मंजूळे, परेश म्हात्रे, पवार, पो.ना.देशमुख, वसावे, म.पो.शि. टाकळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.







