वासांबे गटातील जनतेचा विश्वास
| आपटा | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसचे वासांबे जिल्हा परिषद गटातून संदीप मुंढे हे उभे आहेत. तर, वासांबे पंचायत समिती गणातून रोशन राऊत व रिस पंचायत समिती गणातून निखील डवळे हे उभे आहेत. गेले 28 वर्ष या भागामध्ये संदीप मुंढे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे ते त्यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावर विजय मिळवतील, असा विश्वास जनतेमधून उमटत आहे. त्यांनी दांड फाटा ते रिस कांबा, गणेश नगर, चांभारली स्टॉप, अचानक ग्राऊंड मोहपाडा, मच्छी मार्केट आळी, आंबीवली, खाने आंबीवल मोहोपाडा, पोसरी या सर्व ठिकाणी जोरदार प्रचार केला. यावेळी त्यांच्या प्रचार रॅलीला देखील मतदार जनतेमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मुंढे यांच्या विरोधात भाजपच्या नेहा पारंगे या उभ्या आहेत. मात्र, वासांबे जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांना शेतकरी कामगार पक्ष, मनसे व काँग्रेस यांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळे वासांबे भागातून संदीप मुंढे हे भाजपला मात देत बहुमताने जिंकतील, अशी चर्चा मतदारा जनतेतून होत आहे.







