| पनवेल | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी टपाली मतदानास सुरुवात झाली आहे. पनवेल तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी येथील वि.खे. हायस्कूलमध्ये टपाली मतदान केंद्र उभारण्यात आले होते. यावेळी पोलीस बांधवांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 7 तारखेला प्रत्यक्ष मतदान होणार असून, त्या दिवशी पोलीस अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.






