| रसायनी | प्रतिनिधी |
गुलमर्ग, काश्मीर येथे पार पडलेल्या 12 व्या हिवाळी राष्ट्रीय आईसस्टॉक अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी अत्यंत प्रतिकूल हवामानावर मात करत घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेदरम्यान गुलमर्ग येथे स्नोफॉल झाला होता. तापमान उणे 15 अंश सेल्सिअसइतके खाली घसरले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी विविध वयोगटांत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची लयलूट केली.यात ज्येष्ठ महिला गटात रायगडची कन्या संस्कृती घरत 1 सुवर्ण व 2 कांस्य पदके,धनेशा शिंगोटे 3 कांस्य पदके ज्येष्ठ पुरुष गटात भूपेंद्र गायकवाड 1 कांस्य पदक 23 वर्षांखालील वयोगटात आदित्य खंडिझोड (2 कांस्य),19 वर्षांखालील वयोगटात प्रमोद ठोंबरे (1 कांस्य),16 वर्षांखालील वयोगटात यश मोरे (3 कांस्य)16 वर्षांखालील वयोगटात तन्वी शेलार (1 सुवर्ण, 2 रौप्य)16 वर्षांखालील वयोगटात निसर्गा गावली (1 सुवर्ण, 3 रौप्य) यांनी पदके पटकावली.







