| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि.4) सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास माणगाव येथे अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. महिला फिर्यादीच्या तक्रारीनुसार, मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास म.पो.स.ई. दीपाली जाधव करीत आहेत.







