। तळा । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत दि. 30 जानेवारी 2026 रोजी राज्यस्तरीय मराठी ऑलिम्पियाड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मितल वावेकर रायगड जिल्हा परिषद शाळा तळे मराठी तालुका तळा यांनी आठवा क्रमांक संपादन करून राज्यात आपल्या तालुक्याचे नाव उंचावले आहे.
चालू शैक्षणिक वर्षात संपूर्ण राज्यभर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी, पर्यवेक्षीय अधिकारी यांच्यामध्ये व्यावसायिक विकासासाठी तसेच शैक्षणिक व प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करून स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करण्यासाठी एकूण 42 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वावेकर या केंद्रस्तर, तालुकास्तर, विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तराकरता पात्र ठरल्या. तत्पूर्वी मुंबई विभागातून 80 गुण मिळवून त्यांनी विभागस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला होता. राज्यस्तरावर 75.5 गुण मिळवून त्या आठव्या क्रमांकावर विजयी ठरल्या. यापूर्वी जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच निपुण महाराष्ट्र अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.







