तळा | वार्ताहर |
दिव्यांग व्यक्तींनी आपल्या मनातील अपंगत्वाचा न्यूनगंड काढून टाकावा असे आवाहन दिव्यांग संघटना राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी उपस्थित दिव्यांगांना केले.
तळा तालुका दिव्यांग संघटनेतर्फे रायगड जिल्यातील सर्व दिव्यांग संघटना व दिव्यांग कर्मचारी संघटना अध्यक्ष सचिव यांच्या सहविचार सभेचे आयोजन 21नोव्हे रोजी शहरातील ब्राह्मण सभा हाँल येथे करण्यात आले होते. यावेळी राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्याचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी तळा संघटना अध्यक्ष किशोर पितळे, उपाध्यक्ष सहदेव पारधी, सचिव अमिष भौड, सहसचिव नरेश भौड ,सल्लागार सतिश पैठणकर, रोहा अध्यक्ष अल्ताफ मुल्ला, गोरेगाव माणगांव अध्यक्ष मुकेश शिंदे, श्रीवर्धन अध्यक्ष निलेश नाक्ती , म्हसळा सचिव उमेश अंजारलेकर यांसह तालुक्यातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.