। अलिबाग । प्रतिनिधी ।
जागतिक ग्राहक दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग, जिल्हा पुरवठा विभाग, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग समुद्रकिनारा, अलिबाग बस स्थानक या ठिकाणी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. सुरक्षित उत्पादने आत्मविश्वासू ग्राहक या थीम अंतर्गत ग्राहकांना प्राप्त असणाऱ्या हक्कांचे जसे की, सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्काचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांनी शासनाला सहाय्य करण्याबाबत, जबाबदाऱ्या व कर्तव्ये- पावतीशिवाय माल खरेदी करताना किंमत व गुणवत्ता तपासून घेणे, तक्रार निवारणासाठी योग्य ठिकाणी दाद मागण्यास शिकावे, स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून शक्यतो काळजी घेणे आदी बाबत ग्राहकांमध्ये जागरुकता येणे आवश्यक असल्याने प्रिझमच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमास दिपाली ब्राह्मणकर – सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रशांत शिंदे- अन्नसुरक्षा अधिकारी, सुरेश देवकाते- निरीक्षक वैद्य मापन शास्त्र, हर्षल देशमुख- पुरवठा निरीक्षण अधिकारी, दिलीप पाटील- सहाय्यक लेखा अधिकारी व पुरवठा विभागाचे कर्मचारी, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, प्रतिक कोळी, विनोद नाईक, निकी बेंडे, सेजल काठे, कशिश पाटील यांसह बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता.







