| अलिबाग | प्रतिनिधी |
हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते नववीमधील 50 गरजू मुलींना भारतीय स्टेट बँक हाशिवरे शाखेच्या सीएसआर फंडातून मंगळवारी (दि.24) सायकलींचे वितरण करण्यात आले. शाळा ग्रामीण भागातील असल्यामुळे मुलींना शाळेत येण्यासाठी आदर्श पर्यावरण वाहन सायकलचे वितरण हा उपक्रम राबवण्यात आला. सायकल मिळाल्यावर मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. या कार्यक्रमासाठी भारतीय स्टेट बँकेचे विलास शिंदे रिजनल मॅनेजर, पेण रायगड विभाग, स्वप्निल तांबोळी चीफ मॅनेजर क्रेडिट डिपार्टमेंट पेण, रायगड विभाग, ज्ञानेश्वर जरारे एफ. आय. डिपार्टमेंट पेण, रायगड विभाग तसेच रविंद्र चिंधे शाखा व्यवस्थापक हाशिवरे, आदित्य म्हात्रे, चिराग म्हात्रे, हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या उपाध्यक्षा सरोज डाकी, सुबोध मोकल, निशिकांत मोकल, मुख्याध्यापक बी. डी. गायकवाड, प्रबळकरांच्या उपस्थितीत मुलींना सायकल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी जी. शिकारे यांनी केले.






