| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमधील हातरिक्षाधारकांना अमानवीय प्रथेतून मुक्ती देऊन त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठी सर्वच हातरिक्षाधारकांना ई-रिक्षा देण्यात यावी, असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. तरीदेखील सनियंत्रण समितीने याबाबत काहीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे श्रमिक संघटनेने आपल्या न्याय हक्कासाठी दि.23 मार्चपासून बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतला होता. अखेरीस बुधवारी (दि.25) प्रांतधिकारी यांनी दिलेले पत्र मुख्याधिकारी राहुल इंगळे, अधीक्षक सुरेंद्रसिंग ठाकूर, सपोनि सरिता मुसळे यांच्या उपस्थितीत पत्राचे वाचन केल्यानंतर लवकरच सनियंत्रण समिती सोबत मिटिंग आयोजित करून यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हे बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले आहे. या उपोषणाला संतोष लखन, जहुर चिपाडे, अफजल डोंगरे, अल्ली डोंगरे, दिनेश सुतार, मनोज रेणोसे, आशिष सावंत, अक्षय सकपाळ, भारत कारंडे, गणेश कांबळे, शैलेष शेलार, रोशन माथेरानवाला, संतोष निचिंदे, प्रविण गायकवाड, उज्जवला राणे, दिप्ती सुतार, अनिता चावरे, संगीता कोळी, तुषार जांभळे, सैजाद शेख, मनिषा शिंदे हे उपोषणाला बसले होते. यातील चार जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नगरपरिषदेच्या दवाखान्यात हलविण्यात आले होत.







