पेण, महाड डेपोतून लालपरीचा प्रवास सुरु
अलिबाग | भारत रांजणकर |
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण वगळता बहुतेक मागण्या मान्य झाल्या नंतरही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने एसटी सेवा बंदच असताना रायगड जिल्ह्यातील महाड आणि पेण डेपोतील कर्मचाऱ्यांनी सेवेत पुन्हा रुजू झाल्याने या दोन डेपोतील एसटी फेऱ्या सुरू झाल्या आहेत. विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हे कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.
पेण डेपोतून खोपोली, नागोठणे, पनवेल व अलिबाग मार्गावरील सेवा आज पासून सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.