शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; 16 संघांचा सहभाग
| रायगड | प्रतिनिधी |
ग्रामस्थ व महिला मंडळ नांगरवाडी आयोजित रामराज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोहन दत्तात्रेय धुमाळ पुरस्कृत रामराज विभाग प्रीमिअर लीगचे शुक्रवारी (दि.3) सायंकाळी शेतकरी कामगार पक्षाचे रामराज विभागातील ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. सलग तीन दिवस ही स्पर्धा दिवस-रात्र खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत रामराज विभागातील 16 संघ आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहेत.

रामराज विभाग प्रीमिअर लीगचे हे चौथे पर्व आहे. रामराज प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या स्पर्धेसाठी 272 खेळाडूंनी आपली नोंदणी केली होती. त्यापैकी 224 खेळाडूंची लिलावामध्ये वर्णी लागली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत खेळणारे सर्व खेळाडू रामराज परिसरातील आहेत.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1,25,000 आणि चषक, द्वितीय क्रमांक 70,000 आणि चषक, तृतीय क्रमांक 40,000 आणि चषक, तसेच चतुर्थ क्रमांक 40,000 आणि चषक अशी बक्षिसे असणार आहेत. प्रत्येक सामन्यातील सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळाडूला सायकल आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धेत आपली छाप सोडून मालिकावीर ठरणाऱ्या खेळाडूला दुचाकी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी व्यासपीठावर रामराज विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार गावडे, अशोक खोत, रामचंद्र धुमाळ, सुनील धुमाळ, महादेव पाटील, भरत तांडेल, जनार्दन गावडे, राजू गावडे, संतोष गावडे, विनायक धुमाळ, महादेव धुमाळ, नारायण झावरे, गिरीश झावरे, शाम पाटील, महेंद्र भोईर, हेमंत भोनकर, रमेश पाटील, उमाकांत पाटील, प्रवीण शेळके, रामचंद्र पाटील, ॲड. महेश शिंदे, अनंत झावरे, घनश्याम शेळके, संतोष झावरे, सुहास गावडे, चंद्रकांत बामणे, प्रदीप शेळके, गजानन पालकर, रमेश बाणे, नारायण झावरे, संदीप झावरे, राजेंद्र बामणे, सत्यन पवार, रमेश धुमाळ, महेश झावरे, विकास झावरे, गणेश धुमाळ, मानसी धुमाळ, सुविधा धुमाळ आदी उपस्थित होते. वेदांत कंटक, इम्रान बुखारी, निशांत पाटील, प्रितेश पाटील हे क्रिकेट स्पर्धेचे समालोचन करण्यासाठी उपस्थित होते.
सुनील धुमाळांचा सत्कार
नांगरवाडी गावातील शिक्षक सुनील धुमाळ प्रदीर्घ शिक्षक सेवेतून निवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्ती सोहळा रामराज विभाग प्रीमिअर लीगच्या व्यासपीठावर साजरा करण्यात आला. मोहन धुमाळ आणि महादेव पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक सुनील धुमाळ यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.





