| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास सांगून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले आणि 38 लाख 31 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात 2 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र कुमार श्रीवास्तव हे रिस गाव, रसायनी येथे राहत असून त्यांना काव्य जैन या महिलेचा व्हाट्सअप कॉल आला आणि तिने क्रिप्टो करन्सी मध्ये ट्रेंडिंग करण्यास सांगितले आणि त्यानंतर ट्रेडिंग एक्सपर्ट शशिकांत यांचा मोबाईल नंबर पाठवून ते तुम्हाला शिकवतील असे सांगितले. त्या नंबर वर कॉल केले असता ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. आणि लिंक पाठवली. त्यानंतर फॉर्म भरण्यात आला आणि त्यांनी दहा हजार रुपये टाकले. त्यात त्यांना नफा मिळाला. त्यानंतर सतत ट्रेंडिंग केली तर नफा मिळेल आणि नफ्यातून 30 टक्के आम्हाला द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार जितेंद्र कुमार यांनी 38 लाख 31 हजार रुपये गुंतवणूक केले. यावेळी एक कोटी 18 लाख रुपये नफा झाल्याचे ॲपवर दिसले ते बँक खात्यात ट्रान्सफर करत असताना आले नाहीत. यावेळी 40 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावा लागेल असे सांगितले. मात्र त्यांनी ते भरण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.





