| माणगाव | प्रतिनिधी |
पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या सीआरएस उपक्रमांतर्गत माणगांव तालुक्यातील वनवासी कल्याण आश्रमशाळा, माणगांव तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा, भागाड येथे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व सुरक्षित खेळणी बसविण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार खेळ सुविधांचा लाभ मिळावा, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या अंतर्गत घसरगुंडी, झोपाळा, मंकी बार, सी-सॉ, आदी विविध खेळण्यांची उभारणी करण्यात आली आहे. या खेळण्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक विकास, समन्वय कौशल्ये आणि सामाजिक वर्तन यांचाही विकास होण्यास मदत होणार आहे.
खेळण्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी (दि.9) एप्रिल रोजी पार पडला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ तसेच पोस्को कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामविकास या क्षेत्रांमध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाला शाळा प्रशासन, शिक्षक व स्थानिक नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




