। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलानेच घरातील तिजोरीतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 18 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
30 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान सेक्टर 37 येथील महावीर हेरिटेजमधील घरातून श्रवण सतीश मांढरे याने तिजोरीत ठेवलेले सुमारे साडेसोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली. घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर खारघर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.





