। मुंबई । प्रतिनिधी ।
वयाच्या 92व्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात आज (दि. 12) अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने शनिवारी (दि. 11) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरूवातीपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. शेवटी आज त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. उद्या (दि. 13) आशा भोसले यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर झालेली नव्हती. शेवटच्या क्षणांपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.






