| आगरदांडा | प्रतिनिधी |
विकासाच्या नावाखाली शहरांमध्ये झपाट्याने उभी होत असलेल्या सिमेंटच्या इमारती त्यात वाढती लोकसंख्या मुळे चिमण्यांची घरटी दिसेनाशी झाली आहेत.
शहरात माणसाच्या घराजवळ घरटी बांधण्यासाठी चिमण्यांना जागाच उरलेली नसल्याने सकाळ व सायंकाळच्या दरम्यान चिमण्यांचा चिवचिवाट येणारा आवाज बंद होत असल्याने पक्षीप्रेमीमध्ये चिंता पसरली आहे.
चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या पक्ष्याला प्रत्येक शहरातील नागरिकांना चिमण्यांना जीवदान देण्यासाठी आपापल्या घराबाहेर किंवा परिसरात असलेल्या झाडांवर कृत्रिम घरटी अशी तयार करावीत ती पावासाळ्यात ही टिकुन राहतील.तसेच रोज त्यांना प्रत्येकाने दाणा-पाणी द्यावे जेणेकरून चिमणी स्थलांतर होणार नाही, अशी अपेक्षा पक्षीप्रेमी करित आहेत. ग्रामीण भागात अजुनही कवलारु घरे आहेत त्यामुळे चिमण्या ग्रामीण भागात थोड्या फार दिसत आहेत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व तरी टिकून आहे.शहरात चिमण्यांसाठी जागाच नाही, असं सध्या तरी दिसुन येत आहे.







