सिडको एम डी संजय मुखर्जी यांची माहिती
। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज कधी पूर्ण होणार आणि विमानतळावरून पहिले विमान कधीं उडणार या चर्चेला सिडकोचे एम डी संजय मुखर्जी यांनी ट्विट करून पूर्ण विराम दिला आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी या विमानतळावरून पहिले विमान उडेल अशी माहिती मुखर्जी यांनी ट्विटर द्वारे दिली आहे. त्यामुळे 3 वर्ष्या नंतर पहिले विमान हवेत झेपावताना नवी मुबई कराना पहायला मिळणार आहे.
विमानतळासंबंधी मुखर्जी यांनी विमानतळाचे डिझाईन असलेले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी 2024 साली पहिले विमान उडण्याचे जाहीर केले आहे. वेग वेगळ्या करणामुळे नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजाला वारंवार ब्रेक लागत गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती मध्ये फेब्रुवारी 2018 रोजी या विमानतळाच्या कामकाजाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात झाली होती. या भूमिपूजन कार्यक्रमा नंतर या कामाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यामुळे 2019 ची डेडलाईन हुकली आणि ही डेडलाईन पुन्हा 2020 झाली. वारंवार डेडलाईन बदलत गेल्या ने या विमानतळाचे काम काज पूर्ण होईल का की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र दोन दिवसापूर्वी सिडकोचे एम. डी. संजय मिखर्जी यांनी ट्विटर वर ट्विट करून पहिले विमान कधी उडणार या बाबत माहिती देऊन, अनेक प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे.
नामांतरणाचा मुद्दा गुलदस्त्यात
विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकारने देशभरात एकसुत्री धोरण निश्चित करावे, त्यासाठी केंद्र सरकारच्या नवनियुक्त नागरी उड्डाण मंत्र्यांनी पुढाकार घेऊन धोरण निश्चित करण्यास प्रथम प्राधान्य द्यावं, असं मत याआधी मुंबई उच्च न्यायालयाने केलं होतं. नवी मुंबईतील विमानतळाला दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि माजी खासदार दि.बा.पाटील यांचं नाव द्यावं यासाठी 25 हजारांच्या संख्येने स्थानिक नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी आंदोलन केले. आद्यप देखील हे आंदोलन पेटते ठेवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत नामांतरा साठी पुन्हा लढायला सज्ज रहा अश्या घोषणा बैठकीत देण्यात आल्या आहे.