| पनवेल | प्रतिनिधी |
दुचाकीचा अपघात होऊन 58 वर्षीय व्यक्ती गाडीसह दगडावर जाऊन आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश पावशे (36) हे तळोजा येथील रहिवासी असून, ते एक्टिवा घेऊन नेरे येथे जात होते. त्यांच्यासोबत त्यांचे वडील परशुराम पावशे (58) हे देखील होते. यावेळी एक्टिवा मोटरसायकल भरधाव वेगाने चालवून मोटरसायकल आंबिवली-नेरे रस्त्यावरील स्मशानभूमीच्या जवळ आले असता, दुचाकी रस्ता सोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडावर जाऊन आदळली. या अपघातात परशुराम पावशे हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.






