। पनवेल । प्रतिनिधी ।
जुन्या भांडणाचा राग मनात धरून 27 वर्षीय तरुणाच्या डोक्यात बियरची बाटली मारून इतर मित्रांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा प्रकार कामोठे येथे घडला. याप्रकरणी रोशन सुर्वे रा. करंजाडे आणि इतर सात अनोळखी व्यक्तींविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील जखमी तक्रारदार रोहित कोळेकर रा. कोपरा गाव खारघर हा जेवणाचे पार्सल घेऊन हॉटेलमधून बाहेर पडला. यावेळी रोशन सुर्वे यांनी तक्रारदाराच्या डोक्यात बियरची बाटली मारली. दरम्यान त्याच्यासोबत असलेल्या सात व्यक्तींनी रोहितला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात रोहित गंभीर जखमी झाला.





