| उरण | प्रतिनिधी |
निसर्गाने नटलेला उरण तालुका औद्योगिक दृष्ट्या महत्वाचा तालुका आहे. येथील नवतरुण विकासाच्या दृष्टीने विविध क्षेत्राचे शिक्षण घेत आहेत. मात्र, आवड असूनही छायाचित्रणाचे प्रशिक्षण घेता येत नव्हते. याचाच सारासार विचार करून, “फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट“ यांच्या माध्यमातून आणि जेएनपीए यांच्या सहयोगातून 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत एकूण 40 विद्यार्थी सहभागी झाले होते.
छायाचित्रणाची आवड प्रत्येकालाच असते असे नाही. मात्र, सध्याच्या मोबाईल युगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल कॅमेरा उपलब्ध असल्याने, प्रत्येकजण या कॅमेऱ्यामध्ये आठवणी संग्रहित करत असतो. तर अनेकजण सध्याच्या सोशल मीडियासाठी फोटो, व्हिडीओ मोबाईल किंवा कॅमेराच्या सहाय्याने तयार करत असतात. मात्र, याबाबतचे तांत्रिक ज्ञान नसल्याने प्रभावी चित्रण करता येतं नाही. अशाच छायाचित्रणाची आवड असणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना घेऊन उरणमधील “उरण एजयुकेशन सोसायटी“ शाळेच्या ऑडिटरियम होलमध्ये दि.23 आणि 24 मे रोजी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये छायाचित्रणाचा जन्म, छायाचित्रणाची मुख्य मुलसूत्रे, नेसर्गिक प्रकाषाचा वापर याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आळी.







