| धाटाव | प्रतिनिधी |
हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती रोहा आयोजित बुधवारी (दि.1) कृषी दिन कार्यक्रम प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान, कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपक्रमांतर्गत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी रसायनमुक्त सेंद्रिय शेतीवर अधिक भर द्यावा, सकस शेती करावी, सेंद्रीय शेती काळाची गरज आहे, त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी भावना सभापती विजया पाशिलकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर व्यक्त केली. दरम्यान, तालुक्यातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर आधुनिक सेंद्रिय आणि एकात्मिक शेती पद्धतींबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महादेव सानप, सुदाम रटाटे, अनिल लहाने, भागोजी ढुंमने, श्रीकांत निवाते, प्रदीप दामूगडे, अनंता पाशीलकर, होनाजी हंबीर, ज्ञानेश्वर शेळके, रुपेश साळवी, राजेश शिर्के, एकनाथ वाडकर, गजानन डाकी आदी प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. निधी जाधव, सुरेश मगर, जगन्नाथ धनावडे यांनी मनोगत व्यक्त केले. आयोजित कृषी दिन कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती विजया पाशीलकर, उपसभापती संजय मांडलूस्कर, किसनराव मोरे, निधी जाधव, उर्वशी वाडकर, सुरेश मगर, जगन्नाथ धनवडे, समृद्धी कोळी, गटविकास अधिकारी अमृता उंडरे-पाटील, विस्तार अधिकारी दिलीप पाबरेकर, सहा. गटविकास अधिकारी मनोज लाटे, प्रथमेश डाके, दीपक फाउंडेशनचे दीपक ठोसर, पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी महारुद्र फडतरे यांनी केले.







