। सातारा । प्रतिनिधी ।
पुणे-बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रजजवळील इंदोली फाटा येथे मध्यरात्री अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रजजवळील इंदोली फाटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास काही मित्रांमध्ये वाद झाला. या वादातून संबंधितांनी चार ते पाच गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी दोन गोळ्या जखमीच्या दोन्ही पायात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबारामागील नेमके कारण आणि सहभागींची संख्या याबाबत पोलीस अधिक तपास करीत असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.







