| पनवेल | प्रतिनिधी |
स्कॉलरशिप परीक्षेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा असलेल्या साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप अभ्यास वर्गाचे उद्घाटन साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड, माध्यमिक विभाग मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भूषण जाधव, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक अंकुश जोगळे, बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे आणि इयत्ता चौथी व सातवीचे स्कॉलरशिप विषय शिक्षक उपस्थित होते.






