सुदैवाने प्रवासी सुखरूप
। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
अलिबागहून पनवेलला जाणारी विनाथांबा एसटी बसचा मंगळवारी (दि.21 ) सकाळी अपघात झाला. सुदैवाने एसटीतील 38 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ही घटना पेझारी येथील चेक पोस्ट जवळ घडली. चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या एका बाजूला पलटी झाली.त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.







