| रोहा | प्रतिनिधी |
रोहा मोहल्ला व्हॉलीबॉल क्लब टीमच्यावतीने रोहे अंजुमन उर्दू हायस्कूलच्या मैदानावर दोन दिवसीय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत यजमान रोहा संघाला नमवून फलक गोरेगांव इलेव्हन संघाने पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेत नामवंत संघानी सहभाग घेतला होता. फलक गोरेगांव इलेव्हन संघ संघाला प्रथम क्र.30 हजार रु. व आकर्षक चषक उपविजेता रोहा (‘ए’ टीम) संघाला 15 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.







