। कोर्लई । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील उसरोली बेलवाडीतील एका मतिमंद मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाला. अमृता अंकुश वाघमारे (17) असे मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेलेवाडी आदिवासी वाडी येथील रेखा अंकुश वाघमारे या आपली मुलगी अमृता वाघमारे हिच्यासोबत खुबे पकडण्यासाठी पानखोल ओहोळात गेल्या होत्या. अमृता ही मतिमंद असल्यामुळे तिला ओहोळाच्या किनारी बसवून तिला दगडी गोटा खेळण्यासाठी दिला आणि त्या खुबे पकडण्यासाठी ओहोळात गेल्या. दगडी गोटा नदीत पडल्याने अमृता गोटा आणण्यासाठी ओहळात गेली असता पाण्यात पडून तिचा मृत्यू झाला. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मेंगाळ हे करीत आहेत.







