• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

2029 ला इतिहास घडवायचाय : जयंत पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 2, 2026
in sliderhome, खालापूर, राजकीय, रायगड
0 0
0
2029 ला इतिहास घडवायचाय : जयंत पाटील
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

“मी खचणार नाही, तुम्हीही खचू नका“; कार्यकर्त्यांत नवचैतन्य, महाविकास आघाडीला एकजुटीचा मंत्र

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मी खचणार नाही… तुम्हीही खचू नका. माझा उत्साह टिकवून ठेवण्याची ताकद तुमच्यात आहे, तो आणखी वाढवण्याची ताकदही तुमच्यातच आहे. शेतकरी कामगार पक्ष संपला, असे म्हणणाऱ्यांना आपल्या एकजुटीने आणि संघर्षाच्या बळावर उत्तर द्यायचे आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून 2029 मध्ये नवा इतिहास घडवायचा आहे. त्यासाठी प्रथम ही जुलमी आणि अहंकारी राजवट सत्तेवरून खाली खेचावी लागेल, असा घणाघात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी केला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले, अनेक निवडणुका आपण लढलो, अनेक विक्रम केले. चढ-उतार प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येतात. मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर लढणारा पक्ष म्हणून शेकापची ओळख आजही कायम आहे. देशातील शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारा नेता म्हणून राहुल गांधी यांच्याकडे देश आशेने पाहत आहे.

विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत ते म्हणाले, देशात परिवर्तनाची ठिणगी नेहमी तरुणाईच पेटवत आली आहे. अलीकडील विद्यार्थी आंदोलनानेही तेच सिद्ध केले. त्या संघर्षात शेकाप खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहिला. चित्रलेखा पाटील आणि ॲड. साम्या कोरडे यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांच्या लढ्यात सहभाग नोंदवत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे 2029 ची लढाई ही परिवर्तनाची लढाई असेल. कार्यकर्त्यांनी निराश न होता नव्या जोमाने कामाला लागावे.

गावपातळीवरील संघटनात्मक बांधणीवर भर देताना त्यांनी सांगितले, ग्रामपंचायतींपासून प्रत्येक निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढली पाहिजे. स्थानिक मतभेद बाजूला ठेवून विरोधकांना पराभूत करण्यासाठी एकजूट आवश्यक आहे. उरण तालुक्याने हे करून दाखवले आहे. त्याच धर्तीवर राज्यभर संघटन उभे राहिले पाहिजे. त्यांनी पुन्हा एकदा संघटन बळकट करण्यावर भर देत, कॉम्रेड लेनिन यांनी आम्हाला एकच मंत्र दिला होता; तो म्हणजे, संघटना, संघटना आणि संघटना. हाच विचार गेली 79 वर्षे शेकापला जिवंत ठेवत आला आहे. तोच विचार पुढे नेला, तर पक्षाचे भविष्य अधिक उज्ज्वल असेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. गोरगरीबांच्या हिताचे राजकारण करणारा नेता म्हणून आम्ही अंतुले साहेबांकडे पाहात होतो. कार्यकर्त्यांना अंतिम संदेश देताना त्यांनी पुन्हा एकदा कॉम्रेड लेनिन यांच्या विचारांची आठवण करून दिली. संघटना उभी करा, कार्यकर्ते घडवा आणि जनतेत राहा. हाच शेकापच्या पुढील वाटचालीचा खरा मंत्र आहे, असे आवाहन त्यांनी केले.

विमानतळाला दिबांचे नाव द्या
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत त्यांनी सरकारवर टीका केली. भूमीपुत्रांच्या भावनांचा आदर झाला नाही, तर तीव्र आंदोलन उभारावे लागेल. दुसऱ्या मुंबईच्या उभारणीत जशी फसवणूक झाली, तशी तिसऱ्या मुंबईत होऊ देणार नाही. पेण, पनवेल, उरण, अलिबाग आणि रोहा परिसरातील भूमिपुत्रांच्या हक्कासाठी शेकाप मित्रपक्षांसह मोठा संघर्ष उभारेल, असा इशारा त्यांनी दिला. पनवेल-उरण परिसरातील कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन करत ते म्हणाले, सरकारकडून निघणाऱ्या प्रत्येक आदेशावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. भूमीपुत्रांच्या हक्कांवर गदा येऊ देऊ नका. पनवेल आणि उरणची जनता लाचार नाही; ती संघर्ष करून विजय मिळवणारी जनता आहे.
स्मार्ट मीटरविरोधात गावोगावी रणशिंग फुंकणार
स्मार्ट मीटर योजनेविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत जयंत पाटील म्हणाले, गावोगावी बैठका घेऊन हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले जातील. स्मार्ट मीटर बसविण्यासाठी होणारी सक्ती सहन केली जाणार नाही. महावितरण आणि संबंधित अदानी कंपन्यांच्या मनमानीविरोधात गावपातळीवर तीव्र संघर्ष उभारला जाईल.
नव्या पिढीने संघर्षाची दिशा दाखवली
विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले, या नव्या पिढीने देशाला संघर्षाची दिशा दाखवली. बारा वर्षांत कोणासमोर न झुकणाऱ्या सत्तेलाही विद्यार्थ्यांच्या एकजुटीपुढे माघार घ्यावी लागली. हीच युवाशक्ती परिवर्तन घडवू शकते. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावरील टीकेला उत्तर देण्याऐवजी संसद टाळल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला.
शेकापची चौथी पिढी दिल्लीच्या लढ्यात उतरली
आज आमच्या पक्षाची चौथी पिढी दिल्लीपर्यंत पोहोचली, याचा मला अभिमान आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी युवा नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. चित्रलेखा पाटील आणि ॲड. साम्या कोरडे यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत शेकापचा झेंडा दिल्लीत फडकवला. त्यांचे काम पाहून समाधान वाटते.

Related

Tags: 79th anniversary of the Shekapindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial news
Previous Post

जेएनपीए बंदरात जहाजांना विलंब

Next Post

पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
sliderhome

सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

August 2, 2026
तळ्यात बळीराजा भातलावणीत व्यस्त
उरण

उरणमध्ये भाताची लागवड संथ गतीने

August 2, 2026
पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला
कर्जत

पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला

August 2, 2026
समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!
मुरुड

समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!

August 2, 2026
कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल
पनवेल

कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल

August 2, 2026
पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर
पनवेल

पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर

August 2, 2026
Next Post
पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर

पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?