• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

Antara Parange by Antara Parange
August 12, 2026
in sliderhome, क्राईम, पेण, रायगड
0 0
0
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
कागदपत्रे देणारे कोण? मदत करणाऱ्या तरुणांचीही चौकशी होणार का?

| रायगड/पेण | प्रतिनिधी |

पेण शहरात एका महिलेच्या तक्रारीनंतर समोर आलेल्या कथित बांगलादेशी महिलेच्या प्रकरणाने आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित महिलेला विशेष पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिचे नाव मन्नत निजाम अन्सारी असल्याचे समोर आले असून, ती बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना सर्वात मोठा प्रश्न मात्र तिच्या हातात असलेल्या भारतीय शाळेच्या दाखल्यावरून निर्माण झाला आहे.

31 जुलै रोजी निशा गोडिवले यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यावेळी या तक्रारीची अपेक्षित गांभीर्याने दखल घेण्यात आली का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित महिलेने पोलिसांकडे आजमगड येथील शाळेचा दाखला सादर केला होता. या दाखल्यावर तिची जन्मतारीख 11 डिसेंबर 2004, आईचे नाव सलमा आणि वडिलांचे नाव निजाम असल्याचा उल्लेख आहे.

मात्र, या कथित लिव्हिंग सर्टिफिकेटच्या स्वरूपावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दाखल्यावर मुख्याध्यापकांची सही लाल शाईने असल्याचे, तर काही माहिती अपूर्ण असल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा दाखला खरा आहे का? तो कोणत्या शाळेने जारी केला? संबंधित शाळेच्या नोंदवहीत या महिलेची नोंद आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर ती बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासात निष्पन्न झाले, तर तिला आजमगड येथील शाळेचा दाखला मिळालाच कसा? हे प्रश्न आता तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहेत.

कागदपत्रांच्या मुळापर्यंत पोहोचणार का?
एखाद्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर केवळ दाखला स्वीकारून प्रकरण थांबविण्याऐवजी त्या कागदपत्राची सत्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. संबंधित शाळेची प्रवेश नोंद, जन्मनोंद, पालकांची माहिती, दाखला देण्याची प्रक्रिया आणि तो दाखला नेमका कोणी मिळवून दिला, याचा तपास होणे गरजेचे आहे. हा दाखला बनावट असेल तर तो तयार करणारे कोण? खरा असेल तर त्यामागील संपूर्ण नोंद काय? आणि जर एखाद्या परदेशी नागरिकाला भारतीय कागदपत्रे मिळवून देण्यात आली असतील, तर त्यामागे स्थानिक पातळीवर कोणाचे जाळे कार्यरत आहे? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
पेणमधील दोन तरुणांची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी?
या महिलेला पेण शहरातील दोन तरुणांनी मदत केल्याचा आरोपही पुढे येत आहे. त्यामुळे संबंधित तरुणांचा या महिलेशी नेमका संबंध काय होता, तिची ओळख त्यांना कशी झाली, तिच्या कागदपत्रांबाबत त्यांना काय माहिती होती आणि तिला वास्तव्यास अथवा इतर बाबींमध्ये त्यांनी काही मदत केली का, याची पोलिसांनी सखोल चौकशी करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न!
31 जुलै रोजी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची तातडीने आणि सर्वंकष चौकशी झाली होती का? संबंधित महिलेने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी त्याचवेळी का झाली नाही? केवळ एका दाखल्याच्या आधारे तिच्या नागरिकत्वाबाबत पोलिसांनी भूमिका घेतली असेल, तर ती कार्यपद्धती कितपत योग्य होती? पेण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केवळ संबंधित महिलेपुरता मर्यादित न ठेवता कागदपत्रे तयार करणारे, उपलब्ध करून देणारे, स्थानिक पातळीवर मदत करणारे आणि संपूर्ण प्रकरणामागील संभाव्य साखळी यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. आता या महिलेचे नागरिकत्व, तिच्या कागदपत्रांची सत्यता आणि तिला मदत करणाऱ्या व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होते का, याकडे पेणकरांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspenPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

Next Post

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

खारघरमध्ये कोट्यवधींचा ऐवज लंपास

August 12, 2026
अज्ञाताने घातला दहा लाखांचा गंडा
क्राईम

बिल अपडेटच्या बहाण्याने गंडा

August 12, 2026
Next Post
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?