। राजकोट । वृत्तसंस्था ।
आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करीत भारतीय संघात प्रवेश करणार्या ऋतुराज गायकवाड याने 136 धावांची खणखणीत खेळी साकारल्यामुळे महाराष्ट्राने बुधवारी येथे रंगलेल्या विजय हजारे करंडकातील ङ्गडफ गटातील लढतीत मध्य प्रदेशवर 5 गडी व दोन चेंडू राखून विजय मिळवला व चार गुणांची कमाई केली.
मध्य प्रदेशकडून मिळालेल्या 329 धावांच्या आव्हानाचा महाराष्ट्राने पाच गडी राखून यशस्वी पाठलाग केला. ऋतुराज गायकवाडने 112 चेंडूंचा सामना करीत 14 चौकार व 4 षटकारांसह शतकी खेळी साकारली. त्याआधी मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक भंडारीने 70 धावांची, शुभम शर्माने 108 धावांची व कर्णधार आदित्य श्रीवास्तवने 104 धावांची खेळी साकारत मध्य प्रदेशला 6 बाद 328 धावा उभारून दिल्या.
विदर्भाचे यश
विदर्भ – हिमाचल प्रदेश यांच्यामध्ये ठाण्यात ङ्गअफ गटातील लढत पार पडली. विदर्भाने सात गडी व 61 चेंडू राखून ही लढत जिंकली. विदर्भाचा मध्यमगती गोलंदाज यश ठाकूरने 53 धावा देत पाच फलंदाज बाद केले. 214 धावांचा पाठलाग करताना विदर्भाने अथर्व तायडे (64 धावा), यश राठोड (नाबाद 76 धावा), अक्षय वाडकर (नाबाद 44 धावा) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला.