। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अलिबाग रायगड येथील कर्मचारी उमेश पाटील भायमळा, अलिबाग यांनी सपत्नीक निवोदिता उमेश पाटील यांनी त्यांच्या दोन जुळ्या मुली दिव्या आणि दिक्षा यांच्या वाढदिवसाचे व दिव्यांग दिनाचे औचित्य साधून रक्तदान केले. हे दोघेही पती पत्नी दिव्यांग असून बेटी बचाव बेटी पढाव ही संकल्पना ठेऊन रक्तदानापेक्षा श्रेष्ठदान कोणतेही नाही, रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी ठेवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अलिबाग तर्फे डॉ. दिपक गोसावी, सुनील बंदिछोडे, महेश घाडगे, चेतना वर्तक आदिंनी दोघांना सन्मानपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.