| रांची | वृत्तसंस्था |
कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये झारखंडच्या ग्राम विकास मंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या लेकीचाही समावेश आहे. बुधवारी (दि.23) रात्रीच्या सुमारास कारला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्कापूर झाला.
झारखंडच्या जमशेदपूर जिल्ह्यातील दोमुहानी परिसरात हा अपघात झाला. दोमुहानीजवळ कार आणि बसची जोरदार ध़डक झाली. यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं. अपघातानंतर स्थानिकांनी गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक दुर्घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी मदत कार्य सुरू केलं. या अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या मुलीचा समावेश आहे.
अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या अपघातानंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. मंत्र्यांचे निकटवर्तीय आणि नातेवाईकांनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला. झारखंडचे आरोग्य मंत्री डॉ. इरफान अन्सारी यांनी अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. हा अपघात वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलं. दोमुहानीमध्ये कार आणि ट्रक यांच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे. अपघात नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याची माहिती गोळा केली जात आहे.







