| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबई-मुलुंड येथे झालेल्या 37वी ऑल इंडिया इंटरनॅशनल कराटे स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सभागृहातील कराटे क्लासेसचे खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली असून, चार कराटेपटू यांनी पदके मिळवली आहेत. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी प्रशिक्षक हिरामण गवळी, नंदू म्हसकर, मानसी थवई यांच्या नेतृत्वाखाली नेरळ येथून स्पर्धेसाठी गेलेले श्रेया म्हसे आणि जिया माळी या दोघींनी सुवर्णपदक पटकावले आहे. तर संस्कार म्हसे याने रौप्य, तर कौशल गवळी याने कांस्यपदक मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.





