| पनवेल | प्रतिनिधी |
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठांचा सन्मान करणे, त्यांच्या अनुभवांना मानाचे स्थान देणे आणि त्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचारांचा वारसा आणि शिवसेनेची जनसेवेची भूमिका पुढे नेत समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. मेळाव्यास शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, मावळ लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, शिवसेना प्रवक्ता रायगड जिल्हा सुवर्णा वाळुंज, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्यासह युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





