पोलिसांच्या अनाधिकृत कारवाईचा निषेध; साम्या कोरडे यांचा आंदोलन छेडण्याचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
देशासह महाराष्ट्रात मुंबई अशा अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे त्यांच्या न्याय हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलने सुरु आहेत. मात्र, आंदोलने मोडीत काढण्यासाठी सरकारने पोलीस बळाचा वापर सूरू केला आहे. सोशल मिडीयावरील अकाऊंट बंद करण्यापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून, ही दडपशाही थांबवा अन्यथा उग्र आंदोलन करावे लागणार, असा इशारा शेकाप पुरोगामी विद्यार्थी संघटनाच्या प्रमुख साम्या कोरडे यांनी दिला आहे. मुंबईमध्ये सोमवारी (दि.19) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.
यावेळी व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव, रोहित ढाले आदी उपस्थित होते. नीट पेपर फुटीनंतर देशासह महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात विद्यार्थ्यांनी आंदेोलने सुुरू केली आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी रस्त्यार उतरले आहेत. जूलै महिन्यापासून सुरु असलेली ही आंदोलने आता वेगवेगळ्या ठिकाणी केली जात आहेत. दिल्लीसह मुंबई, पुणे व अन्य भागांमध्ये विद्यार्थी एकवटले आहेत. संविधान मानणारे विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र, सरकार पोलीस बळाचा वापर करीत विद्यार्थ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सायबर विभागाच्या मदतीने अनेक विद्यार्थ्यांचे सोशल मिडीया अकाऊंट बंद केले जात आहेत. वेगवेगळ्या पोस्ट डिलीट मारल्या जात आहे. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्याचे काम पोलिसांमार्फत होत आहे. याबाबत न्यायालयात दाद मागण्यात आली असून, ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम सरकार करीत आहेत. सत्ताधाऱ्यांविरोधात सोशल मिडीयावरील असलेल्या पोस्ट उडविल्या जात आहेत. व्यंगचित्र व इतर पोस्ट बंद करण्यासाठी सरकारने यंत्रणा बसवली आहे. देशासह राज्यात दडपशाहीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून होणाऱ्या अनाधिकृत कारवाईचा निषेध व्यक्त केला जात असून, ही दडपशाही थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा साम्या कोरडे यांनी दिला.
विद्यार्थ्यांचे आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. नोटीस न देता बेकायदेशीररित्या सोशल मिडीयावरील पोस्ट व व्यंगचित्र काढले जात आहेत. अकाऊंट बंद केले जात आहे. देशातील भारतीयांनी सत्ताधाऱ्यांविरोधातील पोस्ट बघू नये म्हणून ही कारवाई केली जात आहे. विश्वगुरू असलेल्या पंतप्रधानांना विद्यार्थ्यांच्या पोस्टची भीती का आहे?
गौरव सर्जेराव,
व्यंगचित्रकार






