। पनवेल । प्रतिनिधी ।
तळोजा एमआयडीसी परिसरात उभ्या केलेल्या वाहनाच्या डिझेल टाकीतून 220 लिटर डिझेल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी साहू यांनी फोर ट्रेन स्टील कंपनीसमोरील रस्त्यावर आपले वाहन उभे केले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वाहनाच्या डिझेल टाकीतून तब्बल 220 लिटर डिझेल चोरून नेले. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तळोजा पोलीस पुढील तपास करत आहेत.







