• Login
Friday, October 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उमटे धरणाच्या दुरुस्तीला ठेकेदाराचा ठेंगा!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 23, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
उमटे धरणाच्या दुरुस्तीला ठेकेदाराचा ठेंगा!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वर्षभराचा 20 लाखांचा ठेका न परवडण्याचे कारण; गळती रोखण्याच्या कामाची जबाबदारी महिनाभरातच झटकली

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

उमटे धरणाच्या जलवाहिन्यांची गळती, पाण्याची टंचाई आणि एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट अशा समस्यांनी हजारो नागरिक त्रस्त असताना, आता दुरुस्तीची जबाबदारी घेतलेल्या ठेकेदारानेच कामातून अंग काढून घेतले आहे. 20 लाख 18 हजार रुपयांचा वर्षभराचा ठेका घेतलेल्या शिवसाई कन्स्ट्रक्शनने वैद्यकीय कारण आणि काम परवडत नसल्याचे सांगत काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आधीच अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या 12 ग्रामपंचायतींमधील 46 गावे आणि 33 वाड्यांतील 65 हजारांहून अधिक नागरिकांच्या पाणीप्रश्नावर पुन्हा टांगती तलवार निर्माण झाली आहे. ठेकेदाराच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित ठेकेदाराविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 1978 साली म्हणजेच 47 वर्षांपुर्वी अलिबाग तालुक्यातील उमटे आणि मोरोंडे गावाच्या सरहद्दीमधून जाणाऱ्या नाल्यावर उमटे धरण बांधले. त्यानंतर 1995 साली हे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे गेल्या 31 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या ताब्यात हे धरण आहे. या धरणाची उंची 56.40 मीटर असून, पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर इतकी आहे. या मातीच्या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 86 एम.सी.एफ.टी इतकी आहे. धरणामधून व्हॉल्व टॉवर द्वारे पाणी शुद्ध करणाऱ्या टाकीकडे नेऊन तेथून शुद्ध पाणी जमीनीवरील टाकीवध्ये साठविले जाते. त्यानंतर या टाकीमधील पाणी वेगवेगळ्या व्यासाच्या पाईप लाईनमधून गाव वाड्यांना पाणी पुरविले जाते. या धरणामार्फत अलिबाग तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींमधील 46 गावे आणि 33 वाड्यांमधील 65 हजारहून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. धरणाजवळील टाकीपासून चौल-नागाव मार्गे आणि अलिबाग-रोहा मार्गे महान फाट्यावर, बोरघर गावाजवळ वितरण नलिका काढण्यात आली आहे. ती महाजने, वावेपासून बेलकडेपर्यंत काढण्यात आली आहे. या गावांना काँक्रीटच्या जमीनीवरील हौद बांधून पाणी पुरवठा नळाद्वारे केला जात आहे. या योजनेमुळे या सर्व गावांना पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

मात्र, मागील अनेक महिन्यांपासून पाईप लाईनमधून पाण्याची गळती होण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई संबंधित गावांसह वाड्यांना सतत भेडसावत आहे. अनेकवेळा दोन ते तीन दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागते. ही समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अलिबाग तालुक्यातील कुदेपासून आक्षीपर्यंत देखभाल दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रियेतून माणगावमधील शिवसाई कंस्ट्रक्शन नावाच्या कंपनीला 20 लाख 18 हजार 109 रुपयांचा वर्षभराचा ठेका देण्यात आला. त्यामध्ये गळती काढणे, कामगार घेणे या कामांची जबाबदारी संबंधित कंपनीकडे देण्यात आली. त्यासाठी 9 सप्टेंबरला कार्याध्येश काढण्यात आला. त्यानंतर साधारणपणे 14 ते 15 सप्टेेंबरला ठेकेदाराने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. फणसापूर, महान फाटा आणि रेवदंडा परिसरातील पाईनची गळती काढण्याचे काम करण्यात आले. कामाचा ठेका घेऊन एक महिना उलटून गेल्यानंतर ठेकेदाराने 21 ऑक्टोबरला उमटेचे काम न करण्याचे पत्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिले. त्याने वैद्यकिय आणि न परवड्यासारखे कारण देऊन कामाला ब्रेक दिल्याचे पत्रात म्हटले आहे. ठेकेदाराच्या या पत्राने जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली. मात्र, या पत्राला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नोटीसीच्या स्वरुपात उत्तर देत तंबी भरली आहे. परंतु, देखभाल दूरुस्तीचे काम थांबल्यास या भागातील हजारो नागरिकांची परवड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जलवाहीनी गळतीचा प्रश्न ऐरणीवर
सुडकोली, बोरघर, रामराज, चिंचोटी, बेलोशी, चौल, रेवदंडा, आक्षी, नागाव इत्यादी ग्रामपंचायतीमधील हजारो नागरिकांना उमटे धरणाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांतील नागरिकांना ठेकेदाराच्या पत्राचा फटका बसण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. जलवाहिनीचे होणारे लिकेज वेळीच दुरुस्त न झाल्यास पुन्हा पाण्यासाठी नागरिकांना वणवण करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
एक दिवस आड पाणी
उमटे धरणाच्या पाणी साठ्याचे नियोजन तसेच आगामी वर्षातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेत पाणी साठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून उमटे धरणाद्वारे पाणी कपातीचे संकट सुरु झाले आहे. उमटे धरणाद्वारे आता एक दिवस आड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती जिलहा परिषद पाणी पुरवठा उपविभाग कार्यालयाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याची समस्या आतापासूनच सुरु झाली आहे.

उमटे धरणातील देखभाल दुरुस्ती म्हणजे गळती काढणे आणि कामगार घेण्यासाठी वर्षभरासाठी शिवसाई कंस्ट्रक्शनला ठेका दिला आहे. 20 लाख रुपयांचे हे काम आहे. मात्र, कंपनीने वैद्यकीय आणि न परवडण्यासारखे कारण सांगून ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे. परंतु, ठेकेदाराचे हे कारण योग्य नाही. निविदा प्रकीया राबविताना दिलेल्या निकषानुसारच काम देण्यात आले आहे. त्यामुळे ठेकेदाराविरोधात कडक कारवाई केली जाईल. जिल्हा परिषदेमार्फत असलेले ठेकेही रद्द केले जातील. त्यांच्या पत्राला नोटीस स्वरुपात उत्तर दिले आहे.

मोहन सरवदे,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, राजिप

उमटे धरणाच्या बाबतीत रायगड जिल्हा परिषद आणि पाणीपुरवठा विभाग सध्या बदनाम आहे. धरणातील साचलेला गाळ काढण्याचे सोडून ज्यामधून फक्त टक्केवारी काढता येईल, अशा कामांच्या निविदा काढून ठेकेदार आणि अधिकारी संगनमताने स्वतःची झोळी भरत आहेत.धरणाच्या बाहेर शेकडो कोटी रुपये खर्च करून टाकलेले पाईप रस्त्याच्या कडेला पाण्याची वाट पाहत आहेत, आवश्यक व गरजेच्या असलेल्या साचलेल्या गाळाचा आणि मुबलक पाण्याचा प्रश्न सोडून जर जिल्हा परिषद वेगळ्या निविदा काढत असेल, तर आम्ही या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

ॲड. राकेश पाटील,
उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsumate damwater shortage crisisZilla Parishad Rural Water Supply Department
Previous Post

चित्रलेखा पाटील यांची नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट

Next Post

जि.प. अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पंतप्रधानांना फक्त उद्योगपती दिसतात- माकप नेत्या वृंदा करात
sliderhome

पंतप्रधानांना फक्त उद्योगपती दिसतात- माकप नेत्या वृंदा करात

October 23, 2026
धावत्या कारने घेतला पेट
sliderhome

धावत्या कारने घेतला पेट

October 23, 2026
‘शिवतीर्थ’वरील साहित्य गायब?
sliderhome

‘शिवतीर्थ’वरील साहित्य गायब?

October 23, 2026
बीएसएनएल टॉवरवर चोरी करताना जेरबंद
sliderhome

बीएसएनएल टॉवरवर चोरी करताना जेरबंद

October 23, 2026
खड्ड्याने घेतला एकाचा बळी
sliderhome

लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू

October 23, 2026
पीएनपीच्या विद्यार्थांची रायगड जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेसाठी निवड
अलिबाग

पीएनपीच्या विद्यार्थांची रायगड जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेसाठी निवड

October 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?