| पनवेल | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा येथे असलेल्या टोलनाक्यावर रविवारी (दि.25) रात्री प्रवासी आणि टोल कर्मचारी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेची व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या व्हिडिओमध्ये लाठ्या-काठ्यांचा वापर झाल्याचे पाहायला मिळत आहे. खारपाडा टोल नाका येथे रविवारी रात्रीच्या सुमारास बसमधील प्रवासी आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये टोल भरण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर फ्रीस्टाइल हाणामारीत झाले. पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणत आणली आणि पुढील तपास सुरू केला. कोकणातून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने जाणारा बसचा टोल भरण्यावरून टोल कर्मचारी व बस मधील प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपास गेला की टोल कर्मचारी व प्रवाशांमध्ये बाचाबाची होऊन फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. या घटनेची माहिती समजल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी झाली आणि एकमेकांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी येत येथील परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.






