• Login
Saturday, November 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

ठेकेदारांच्या भेटवस्तूंनी कार्यालये गजबजली?

Antara Parange by Antara Parange
November 7, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
ठेकेदारांच्या भेटवस्तूंनी कार्यालये गजबजली?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

एकीकडे श्रीवर्धन तालुक्यातील जनता भीषण पाणीटंचाईच्या संकटाशी झुंज देत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके करपण्याची वेळ आली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. अशा विदारक परिस्थितीत तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ठेकेदारांकडून दिवाळी भेटवस्तूंची सरबराई सुरू असल्याची चर्चा रंगू लागल्याने श्रीवर्धनच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दुष्काळाच्या झळांनी सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना, शासकीय कार्यालयांमध्ये ठेकेदारांच्या वाहनांच्या फेऱ्या नेमक्या कशासाठी सुरू आहेत, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असेल, शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतील, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाकडे अपेक्षेने पाहावे लागत असेल, तर अशा वेळी प्रशासनाने जनतेच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देणे अपेक्षित आहे. परंतु, याच काळात ठेकेदारांच्या वाहनांच्या शासकीय कार्यालयांतील फेऱ्यांची चर्चा सुरू होणे ही बाब निश्चितच गंभीर आहे. जनतेच्या करातून चालणाऱ्या कार्यालयांमध्ये लोकहितापेक्षा ठेकेदारांच्या दिवाळी भेटवस्तूंना अधिक महत्त्व दिले जात आहे का? दुष्काळग्रस्तांच्या वेदनांपेक्षा या भेटवस्तूंचे आकर्षण मोठे ठरत आहे का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ठेकेदाराचे वाहन तहसील कार्यालयाबाहेर दिवाळी भेटवस्तू देण्यासाठी तासनतास उभे असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, संबंधित वाहन तालुक्यातील इतर शासकीय कार्यालयांमध्येही फेऱ्या मारताना दिसल्याची चर्चा आहे. या वाहनातून नेमके काय आणले होते? कोणाला भेटवस्तू देण्यात आल्या? त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या का? की हा केवळ गैरसमज आहे? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र, या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने या चर्चेकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ठेकेदार हे शासनाच्या विविध विकासकामांचे कंत्राटदार असतात. त्यांच्या कामांच्या गुणवत्तेवर, बिलांच्या मंजुरीवर, कामांच्या तपासणीवर आणि नियमपालनावर संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. अशा परिस्थितीत संबंधित ठेकेदारांकडून अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या गेल्या असतील किंवा स्वीकारल्या गेल्या असतील, तर हा केवळ दिवाळीच्या शुभेच्छांचा विषय राहत नाही. त्यातून प्रशासकीय निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. उद्या याच ठेकेदाराच्या कामात निकृष्ट दर्जा आढळला, कामात अनियमितता झाली किंवा एखाद्या नागरिकाने तक्रार दाखल केली, तर संबंधित अधिकारी कोणत्याही दबावाशिवाय आणि पूर्वग्रहाशिवाय चौकशी करतील का? भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीमुळे प्रशासकीय निर्णयप्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे का? याची चौकशी होणे आवश्यक आहे.

श्रीवर्धनची जनता आज दुष्काळाने होरपळत आहे. अशावेळी प्रशासनाने ठेकेदारांच्या मेहेरबानीच्या चर्चेत अडकण्याऐवजी जनतेच्या सेवेसाठी उभे राहिले पाहिजे. एकीकडे तहानलेल्या जनतेचा आक्रोश आणि दुसरीकडे ठेकेदारांच्या दिवाळी भेटींची चर्चा सुरू आहे. त्यामुळे श्रीवर्धनच्या प्रशासनाने आता मौन सोडून सत्य जनतेसमोर मांडावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नागरी सेवा नियमांना बगल
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी सचोटी, कर्तव्यनिष्ठा आणि निष्पक्षता राखणे अपेक्षित आहे. नियम 12 मध्ये भेटवस्तू स्वीकारण्यासंबंधी निर्बंध व तरतुदी आहेत. विशेषतः शासकीय कामांशी व्यावसायिक संबंध असलेल्या कंत्राटदारांकडून भेटवस्तू स्वीकारण्याच्या बाबतीत नियमांचे पालन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय घडले, भेटवस्तूंचे स्वरूप काय होते आणि कोणत्या नियमांचे पालन करण्यात आले, याची अधिकृत तपासणी होणे गरजेचे आहे, अशी मागणी श्रीवर्धनमधील जनतेकडून होत आहे.
कठोर कारवाईची मागणी
श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला सध्या भेटवस्तूंच्या चर्चेपेक्षा पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना मदत, जनावरांना चारा आणि दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे तहसीलदारांसह संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराची तातडीने दखल घ्यावी. संबंधित वाहनाच्या फेऱ्यांची, भेटवस्तूंच्या संभाव्य वितरणाची आणि त्यामागील उद्देशाची वस्तुनिष्ठ चौकशी करावी. नियमबाह्य कृत्य आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhanshrivardhan newssocial media newssocial news
Previous Post

विद्युत खांब उभारणीत हलगर्जीपणा

Next Post

‘कन्यारत्न योजने’अंतर्गत पालकांना धनादेश वितरित

Antara Parange

Antara Parange

Related Posts

विद्युत खांब उभारणीत हलगर्जीपणा
पेण

विद्युत खांब उभारणीत हलगर्जीपणा

November 7, 2026
रोहा तालुक्यातील बळीराजा संकटात
रायगड

रोहा तालुक्यातील बळीराजा संकटात

November 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा

November 7, 2026
बोगस शिधापत्रिकाधारकांचा पर्दाफाश
पनवेल

बंद रेशनकार्ड पूर्ववत करण्याची मागणी

November 7, 2026
मराठमोळ्या गीतांनी रंगली कळंबोलीची ‘दिवाळी पहाट’
कार्यक्रम

मराठमोळ्या गीतांनी रंगली कळंबोलीची ‘दिवाळी पहाट’

November 7, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

90 टक्के वेतनावर एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी

November 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?