जयंत पाटील, चित्रलेखा पाटील यांची उपस्थिती
| भाकरवड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथील रायगड भूषण पत्रकार दिपक पाटील संपादीत ‘रायगड मित्र’ या सतराव्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते आणि शेकाप महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.8) अलिबाग येथे करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला वाघ्रण सरपंच राजेंद्र पाटील, माजी सरपंच उदय पाटील, पेढांबे उपसरपंच रुपेश पाटील, सदस्य अनिल पाटील, रुबीना कुरेसी, कर्मचारी अजित पाटील, तंटामुक्त अध्यक्ष गिरीश पाटील, तुकाराम पाटील, प्रमोद पाटील, विवेक पाटील, संजय पाटील, जीवन पाटील, गौतम पाटील, संजय पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत पाटील, राजेश तांबोळी, मनोहर पाटील, मकरंद पाटील, प्रज्ज्चल पाटील आणि प्रकाशक क्षितिज पाटील आदी उपस्थित होते.






