एक जागा बिनविरोध तर ओबीसीच्या चार जागी निवडणूक स्थगित
। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा नगर पंचायतीच्या 17 प्रभागातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी नाम निर्देशन पत्र दाखल करून घेण्याचे काम पुर्ण झालेवर मा.उच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षणाच्या जागेसाठी स्थगिती दिली असली तरी महाराष्ट्र राज्य निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आदेशानुसार निवडणुकीची पुढील कार्यवाही सुरू आसुन म्हसळा नगर पंचायतीमध्ये 17 पैकी 4 प्रभागात ओबीसींना आरक्षित आहेत.उर्वरित 13 प्रभागात निवडणूक कार्यक्रम सुरू आसुन प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा बिनविरोध झाली आहे. दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 5 मधील एक मेव उमेदवाराने नामनिर्देशन पत्र मागे घेतला असल्याने आता 12 जागांसाठी 37 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी माहिती देताना सांगितले.आज दिनांक 14 रोजी उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात येणार आसुन निवडणूक कार्यक्रमानुसार सर्व प्रकिया पार पडली जाणार असल्याचे सांगितले.ओबीसींच्या चार आरक्षित जागा वगळता निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 उमेदवार,काँग्रेसचे 6,शिवसेना 6,भाजप 7,शेकाप प्रणित 4 आणि अपक्ष 3 यांचा समावेश आहे.म्हसळा नगर पंचायतीमध्ये शिवसेना,काँग्रेस पक्षाची युती आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप आणि शेकाप स्वबळावर निवडणूक लढवीत आहे.आज दिनांक 13 डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षण स्थगिती बाबतचा निकाल मा.उच्च न्यायालया मार्फत जाहीर होणार असल्याचे समजते असे असले तरी नगर पंचायतीच्या उर्वरित जागांसाठी निवडणूक प्रकिया सुरळीतपणे सुरू आहे.