मुंबई | प्रतिनिधी |
उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे युनिटने समीर वानखेडे यांना नोटीस बजावली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे युनिटने 1997 मध्ये परवान्यासाठी केलेल्या अर्जात चुकीची माहिती दिल्याबद्दल समीर वानखेडे यांच्या नवी मुंबई बारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून ही माहिती समोर आली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधताना ते एका बारचे मालक असल्याचा दावा केला होता. वानखेडे हे नवी मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असून त्याचा परवाना वानखेडेंच्या नावे आहे, असं मलिक यांनी सूचित केलं होते.