नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ओबीसी आरक्षणासंबंधित सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणावरील सुनावणी बुधवारी होणार आहे. बुधवारी (15 डिसेंबर) सकाळी 11 वाजता पुढील सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने इम्पिरीकल डेटा उपलब्ध करून द्यावा याबाबत राज्य सरकारचा युक्तिवाद आहे. निवडणुकांबाबत ही युक्तिवाद झाला असून उरलेला युक्तिवाद आता बुधवारी होणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिका न्यायालय एकत्रित ऐकणार आहे. राज्य सरकारसह एकूण तीन हस्तक्षेप याचिकांवरील सुनावणी मंगळवारी होणार होती.







